ब्राम्हण समाज आरक्षणासाठी आक्रमक, विधान भवनावर धडकणार मोर्चा

Foto

औरंगाबाद - विधानसभेमध्ये नुकतेच मराठा आरक्षणाचे विधेयक पारित झाले. त्यानंतर आता ब्राह्मण समाजाने देखील आरक्षणासाठी मागणी केली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर औरंगाबादमध्ये समन्वय समिती स्थापित करुन जवळजवळ ३० संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

 

याबाबत २२ जानेवारी रोजी मुंबईमध्ये आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसण्याचा इशारा ब्राम्हण समाज समन्वय समितीने दिला आहे. यानंतर हा मोर्चा २२ जानेवारी रोजी विधान भवनावर धडकणार, असेही सांगण्यात आले. यासाठी समन्वयकांची समिती स्थापन करण्यात आली असून, येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वय समिती जागृती यात्रा काढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी धनगर, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यातच आता ब्राह्मण समाजाने ही आरक्षणाची मागणी केल्याने सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार